Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नरभक्षक वाघाने घेतला तिसरा बळी..

आरमोरीत नरभक्षक वाघाच्या दहशतीने नागरिक भयभीत...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,
आरमोरीरत वाघाच्या हल्ल्याची या महिनाभरातील तिसरी घटना असून काहि दिवसापूर्वी अरसोडा येथील एका महिलेला शेतावर जात असताना हल्ला करून वाघाने ठार केले होते. तर त्या अगोदर आरमोरी येथीलच एका शेतकऱ्यांचा या नरभक्षक वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे या परिसरात नरभक्षक वाघाची नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, त्या नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करून बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गडचिरली दि,१९ जून :  आरमोरी तालुक्यात नरभक्षक वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आज एका  वाघानी आणखी एकाचा बळी घेतला आहे.वासुदेव मुरलीधर मेश्राम (४५) रा.इंजेवारी असे मृत व्यक्तीचे नाव असून, महिनाभरात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. वाघाच्या दहशतीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या नरभक्षक वाघांना तातडीने जेरबंद अथवा ठार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वासुदेव मेश्राम हे आज सकाळीच सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी-सिर्शी रस्त्यालगत असलेल्या जंगलात सायकलने गेले होते. रस्त्याने जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. दरम्यान वासुदेव यांच्यावर वाघाने हल्ला करतानाचा थरार एका वाटसरूने पाहिला, परंतु वासुदेव यांना वाचवण्यासाठी तो काहीच करू शकला नाही इतक्या वेगात सर्व घटना घडली. सदर वाटसरूने वाघाच्या हल्ल्याची माहिती गावकऱ्यांना तसेच, वन विभागाला दिली. गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वासुदेव यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता, काही अंतरावर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत जंगलातील झूडपात आढळून आला.

दरम्यान वाघाच्या हल्ल्याची या महिनाभरातील तिसरी घटना असून काहि दिवसापूर्वी आरमोरी जवळील
अरसोडा येथील एका महिलेला शेतावर जात असताना हल्ला करून वाघाने ठार केले होते. तर त्या अगोदर आरमोरी येथीलच एका शेतकऱ्यांचा या नरभक्षक वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे या परिसरात नरभक्षक वाघाची नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, त्या नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करून  बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

गडचिरोलीत १६,८४८ उमेदवार देणार पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कुरखेडा तालुकाध्यक्षपदी जास्वदा गावडे यांची नियुक्ती…

Comments are closed.