Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चषक भव्य प्रोडांचे खुले प्रो कबड्डी सामने आयोजन

चामोर्शी तालुक्यातील येडानूर येथे नवयुवक क्रीडा मंडळ येडानूर यांच्या सौजन्याने.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चामोर्शी  3 फेब्रुवारी :- युवक या देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले,चामोर्शी तालुक्यातील येडानूर येथे नवयुवक क्रीडा मंडळ येडानूर यांच्या सौजन्याने क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चषक भव्य प्रोडांचे खुले प्रो कबड्डी सामने आयोजित उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून बोलत होते, ते बोलताना म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल, क्रिकेट,कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतःकडून पारितोषिक देत असताना माझा एकच उद्देश्य आहे.

युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगले खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक, शैक्षणिक व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार 35001 हजार रुपये, दितीय 27001 हजार रुपये ,तर तृतीय 21001 हजार रुपये,याठिकानी देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येडानूर ग्रा.प. सरपंच रजनीताई उसेंडी होते संतोषजी पदा माजी सरपंच येडानूर,सुनील पवार उपसरपंच येडानूर,मुरलीधर कुंभमवार,रवींद्र कूळमेते,बालाजी पोटावी, जीवन पोटावी,पतरुजी पोटावी माजी पोलीस पाटील ,निर्मला कुभंमवार सदस्य येडानुर,देविदास पोटावी सदस्य ग्रा.प.येडानूर,सुभाष जाधव,पांडुरंग उसेंडी,वेलादी म्याडम,कोदळे सर,गोटपोळे सर,प्रकाश दुर्गे,राकेश साडमेक तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

नवयुवक क्रीडा मंडळ येडानूर यांच्या सौजन्याने क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चषक भव्य प्रोडांचे खुले प्रो कबड्डी सामन्याचे अध्यक्ष रोशन पोटावी,उपाध्यक्ष विशाल कड्यामी,सचिन मेश्राम, सचिव राजेंद्र मडावी सहसचिव महेश मेश्राम,तारेश पोटावी कोषाअध्यक्ष अजय महा,नितेश पोटावी, क्रीडाप्रमुख सुरेश लेखामी, मधुकर पोटावी इत्यादी मंडळगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग प्रयत्नशिल होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी “आमचा वेगळा विदर्भ झाला पाहिजे” घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.