Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू

कर्नाटकातील उटीजवळ तामिळनाडूच्या सीमेवरील निलगिरी जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश होऊन ही भीषण दुर्घटना घडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ८ डिसेंबर : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी जंगलात आज दि. ८ डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टरमधील १३  जणांनी प्राण गमावले. यामध्ये भारतीय लष्करातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की ज्या जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळलं, तिथली झाडं अक्षरश: आगीने जळून गेली. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आगीच्या ज्वाळा पसरल्या. झाडं अर्धवट तुटली होती. काही झाडं आगीच्या ज्वाळांनी पेटली.

संबंधित बातमी : ब्रेकिंग; संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अपघातात सुरुवातीला तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

DNA चाचणीने मृतदेहांची ओळख
दरम्यान, या अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे सर्वजण आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती, प्रशासनाने दिली आहे.

हे देखील वाचा :

अचानक स्वच्छंद फिरतांंना आढळला वाघ… अन् जवळ असलेल्या लोकांना कळले नसल्याने उडाली तारांबळ

वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

… या गावात वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.