Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

… या गावात वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. ७ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सध्या एका वाघाची मोठी दहशत पसरलेली आहे.  गेल्या चार दिवसापासून वाघाचा मुक्त संचार असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही खामगाव शहरातील फक्कड देवी परिसरात या वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.  या मंदिर परिसरात या वाघाने एका वासराची शिकार केल्याची घटना घडली आहे.

खामगाव शहरात वाघ शिरल्या पासूनची ही पहिलीच शिकार समोर आली आहे. त्यामुळे अजूनही वाघाने शहर सोडलं नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खामगाव शहरावर वाघाची दहशत असून वाघाने शिकार केल्याचं समोर आल्यानंतर खामगावकर पुन्हा दहशतीत गेले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे वाघाला पकडण्याचे मोठ आव्हान आता वन विभागा समोर आहे.  वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या वाघाने दोन वेळा चकवा दिला आहे. त्यामुळे आता वाघ पकडण्यासाठी वन कर्मचारी झटत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खामगावात वाचाची दहशत 

या अगोदर शनिवार दि. ४ डिसेंबर रोजी  पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान एका महिलेला हा वाघ शहरातील भर वस्तीतील एका बोळीतून जाताना दिसला. अवघ्या दोन फुटाचे अंतर राहून या महिलेने या वाघाला बघितलं आणि वाघ गावात शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्या महिलेच्या घरासमोरच लावलेल्या एका घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा वाघ कैदही झाला. मात्र वन विभागाकडुन यांला दुजोरा देण्यात आला नव्हता. सकाळी चार वाजता आढळलेला वाघ दुपारी चार वाजेपर्यंत शहरात असल्याची भनकंही वनविभागाने स्वतःला लागू दिली नाही. अनेकांनी वनविभागाला फोन कॉल्स केले, माहिती दिली मात्र तो वाघ नसल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास प्रत्यक्षरीत्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ह्या वाघाचं दर्शन झालं. त्यानंतर दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभागाकडून या वाघाला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र थंडीचे दिवस असल्याने लवकरच अंधाराने या परिसरावर कब्जा केला आणि अंधाऱ्या रात्रीत वाघ या वन कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन निघून गेला होता.

 

हे देखील वाचा :

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत !!

 

 

 

Comments are closed.