Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात वाघाची दहशत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बुलढाणा, दि. ७ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शनिवारी दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी एका वाघाने संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले. त्यानंतर वनविभागाने उशीरा कारवाई करीत वाघाच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र अंधार्‍या रात्री वाघ वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाला.

त्यानंतर हा वाघ शहरात आहे किंवा शहराच्या बाहेर गेला याचा थांगपत्ता लागला नसून वन विभागाकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. मात्र या सर्व घडामोडीत खामगाव शहरातील ज्या भागात हा वाघ दिसला होता. त्या परिसरातील काही किलोमीटर मधल्या शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय शाळांकडून घेण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आधीच कोरोनामुळे या शाळा बराच काळ बंद होत्या, आता पुन्हा वाघाच्या दहशतीमुळे या शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. खामगाव शहरातील ज्या भागात वाघाचा संचार आढळून आला होता. त्या भागातील या शाळा-महाविद्यालय आता वाघ मिळेपर्यंत बंद असणार आहेत.  त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा शोध घेऊन खामगावकरांना वाघाच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी होताना दिसत आहे.

संबंधित बातमी :  ... या गावातील वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे वनविभाग वाघ पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी वाघ पकडल्याशिवाय खामगावातील शाळा सुरू होणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता परिसरातील शाळांकडून घेण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका!.. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार; नगरविकास विभागाचा निर्णय

 

 

Comments are closed.