Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खडसेंनंतर मराठवाड्यातील भाजपच्या जयसिंगराव गायकवाड या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीवरुन भाजपमध्येही नाराजीनाट्य रंगले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामा पाठवून त्यांनी भाजप पक्षाचा त्याग केला. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले होते. त्यानंतर मराठवाड्यातील या मोठ्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीचे गणित बदलू शकते.

जयसिंगराव गायकवाड यांनी आज सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवून भाजपच्या प्रदेश कार्य समिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी घोषित न झाल्यामुळे ते पक्षावर नाराज होते. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. “मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा मुळचा भाजपचा आहे. इथे नवीन प्रयोग थांबवून हा मतदारसंघ खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्या”, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली होती. त्यामुळे जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता ते आपला अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.