Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई17 नोव्हें :- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावली. यावेळी शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांचीही उपस्थिती होती. सकाळपासूनच शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येत आहेत. कोरोनाव्हायसरचा संसर्ग सुरु असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे शरीराने आता आमच्यासोबत नसले तरीही त्यांचे विचार आमच्यासोबत कायम राहतील असे उद्गार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी काढले. बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि आताचे हिंदुत्व यावरही टिप्पणी त्यांनी केली. शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच स्मृतीस्थळाच्या ठिकाणी हजेरी लावली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आदींचीही उपस्थिती होती. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महापौर किशोरी पेडणेकर आदींनीही हजेरी लावली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करु नका, आपल्या घरातूनच त्यांना अभिवादन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना केलं आहे. तसेच स्मृतीस्थळाच्या ठिकाणी फार कोणाला प्रवेश देऊ नका, अशी सूचनाही मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. त्यानुसार इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.