Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंगार धातूचा वापर करून चारचाकी वाहन बनवणाऱ्या माणसाला आनंद महिंद्रा देणार बोलेरो भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

सांगली, दि. २३ डिसेंबर :  सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथील दत्तात्रय लोहार यांनी भंगार धातूचा आणि दुचाकीच्या साहित्या पासून बनवलेल्या दिमाखदार चारचाकी वाहनाची दखल महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून छोटी चारचाकी बनवल्याबद्दल दत्तात्रय लोहार यांना बोलेरो वाहन भेट देण्याची घोषणा केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दत्तात्रय लोहार हा एक अशिक्षित व्यक्ती आहे, परंतु त्याच्या मुलाला कार घ्यायची इच्छा असल्याने त्यांनी चारचाकी वाहन तयार करण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांनी भंगार धातूचा आणि दुचाकीच्या साहित्याचे वापर करून चार चाकी वाहन बनवून दाखविली. या वाहनाबद्दल आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे.

ट्विटर अकाऊंटवर आनंद महिंद्रा यांनी  व्हिडिओ शेअर करताना सांगितले की हे वाहतूक नियमांच्या कुठल्याही नियमांमध्ये बसत नाही. परंतु  मी आमच्या लोकांच्या कल्पकतेची प्रशंसा आणि ‘कमीत अधिक’ या आपल्या लोकांच्या क्षमतेविषयी  कौतुक करणे कधीही सोडणार नाही. म्हणून ”मी त्याला वैयक्तिकरित्या बदल्यात बोलेरो ऑफर करेन’. असे आनंद महिंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

विदर्भात पेट्रोकेमिकल्स व रिफायनरी कॉम्प्लेक्स उभारून युवकांसाठी रोजगार निर्मिती करा – खा. अशोक नेते

प्रख्यात लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे ‘ओटीटी’व्दारे आणणार लावणी;लावणीला मिळणार आता नवे व्यासपीठ

राज्य सरकारमध्ये ९०० पदांसाठी मोठी भरती

 

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.