Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा- यशोमती ठाकूर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 5 डिसेंबर:- शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित केला होता. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकार स्थिर चालवायचं असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा, असा थेट इशारा यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख न करता दिला आहे.

राज्यात एकीकडे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालांमध्ये आपली एकजूट दाखवत महाविकास आघाडीने भाजपला दणका दिला आहे. तर दुसरीकडे अजूनही महाविकासआघाडीत अंतर्गत धुसफूस मात्र कायम असल्याचेच चित्र आहे. शरद पवार यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित केला होता. त्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर नाराज झाल्या असल्याचं दिसत आहे. त्यांनी ट्वीट करून सरकारमधील नेत्यांनी आघाडी धर्म पाळा, असं मोठं विधान शरद पवार यांच्या नामोल्लेख न करता केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऐका व्रत मुलाखत मध्ये दिलेल्या मुलाखती शरद पवार यांना राहुल गांधींच्या नेतृत्व गुणांवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी, “राहुल गांधींमध्ये सातत्याचा अभाव आहे” असे मत पवारांनी नोंदवले होते. त्यावरून आता राज्यातील काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यशोमती ठाकूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.” पुढे यशोमती ठाकूर असेही म्हणाल्या कि, “काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.