Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना लस जून २०२१ पर्यंत उपलब्ध होऊ शकेल-किरण मुजूमदार शॉ

Get real time updates directly on you device, subscribe now.

बंगळुरू: संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या ‘कोरोना’ला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्याचे प्रयत्न जगभरात होत असून भारतात जून २०२१ पर्यंत लस उपलब्ध होऊ शकेल. मात्र, तिचे वितरण देशभरातील सर्व नागरिकांपर्यंत करणे हेच आव्हानात्मक आहे, असे मत बायोकॉन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक किरण मुजूमदार शॉ यांनी व्यक्त केले.

‘बायोकॉन’च्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोनाच्या लसीबाबतही आपले मत आणि विचार मांडले.

कोरोनाची पहिली ‘एमआरएनए’ लशीला या वर्ष अखेरीस मान्यता मिळू शकेल. मात्र, ती भारतात उपलब्ध होऊ शकत नाही. तिच्या साठवणुकीसाठी उणे ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या कोल्ड चेनची आवश्यकता आहे, असे शॉ मुजूमदार यांनी सांगितले. जानेवारीपर्यंत एस्ट्राजेनेका, किंवा ‘भारत बायोटेक’ने विकसित केलेली लस येऊ शकते. त्यानंतर २- ३ महिन्यात त्याच्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’ पूर्ण झाल्या तरी त्याला पुढच्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परवानगी मिळू शकेल. त्यामुळे भारतात २०२१- २२ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकेल, असे त्या म्हणाल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतात लसीचे वितरण करण्यामध्ये येऊ शकणाऱ्या अडचणींबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, भारतात एवढ्या मोठ्या संख्येने, विशेषतः प्रौढ व्यक्तींमध्ये लसीकरण कधीच करण्यात आलेले नाही. पोलिओचे लसीकरण आपल्याकडे वर्षानुवर्ष केले जाते. मात्र, पोलिओची लस आशा कार्यकर्ताही देऊ शकते. कोरोनाची लस स्नायूंच्या आतमध्ये द्यावे लागते. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, म्हणजे नर्सेस, डॉक्टर्स आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता लागणार आहे. प्रशिक्षित मनुष्यबळासह लसीच्या साठवणुकीसाठी ‘कोल्ड चेन’ची मूलभूत सुविधा विकसित करावी लागणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.