Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोलापुरातील सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना चक्कर येऊन कोसळले,

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर दि.११ : शहर पोलिस आयुक्तलायातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांच दुर्दैवी निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे सकाळी जीममध्ये व्यायम करत असताना भोसले यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच सोलापूर पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. अचानक आपला सहकारी आपल्यातून निघून गेल्याने सोलापूर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. व्यायाम करत असताना त्यांना अचानकपणे चक्कर आली. यावेळी ते ट्रेडमिलवरच कोसळले. जिम ट्रेनरने तात्काळ त्यांच्या छातीला पंपिग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते शुद्धीत आले. थोडा वेळ आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा व्यायामाला सुरुवात केली. यावेळी त्यांना अचानक दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा जिममध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.