Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज टीम

गडचिरोली 10 Aug 2021 :- अहेरी तालुका, दिनांक ९ऑगस्ट 2021 ला अहेरी तालुक्यातील मौजा- पेरमिली येथे पारंपरिक पेरमिली ईलाका पट्टीतील सर्व ग्रामसभां तर्फे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम हे शासनाचे कोविड बाबतचे नियम पळून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष – तिरु. यशवंत मडावी, जेष्ठ नागरीक कोडसेलगुडम ( पेरमिली),
कार्यक्रमाचे उदघाटन – तिरु. प्रा. रमेश हलामी सर अहेरी,आदिवासी समाजाचा झेंडा वंदन – तिरु. डॉ. कान्ना मडावी साहेब – ( अधिक्षक- अहेरी उपजिल्हा रुग्णालय ).

कार्यक्रमाचे पुजारी – तिरु. मूलसीराव सडमेक- पेरमिली, तिरु. मालाय्या सकाटी ( कोडसेगुडम ) यांचा शुभा हस्ते पारंपरिक पद्धतीने पुजा व आदिवासी समाजाचा महापुरुषांचे फोटोला मोहा फुल हरपुन, दीप प्रज्वलित करून, कार्यक्रमाला सुरू करण्यात आला. यावेळी मार्गदर्शनात – तिरु. डॉ. कान्ना मडावी साहेब – ( अधिक्षक – अहेरी उपजिल्हा रुग्णालय), तिरु. प्रा. रमेश हलामी सर- ( अहेरी), तिरु. भास्कर तलांडे – (सभापती पं.स.अहेरी), तिरु. ऍड. किशोर पुंगाटी – ( जुव्वी), तिरु. बालाजी गावडे – ( माजी सरपंच येरमनार), तिरु. संबय्या करपेत- ( माजी सरपंच कमलापुर), तिरु. शंकर गावडे सर, ( वेडामपल्ली), इत्यादी मान्यवरांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपला आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, सर्व प्रथम आप – आपले मुलां – मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेतला पाहिजे, त्यानंतर देशातील सर्व उच्चस्तरीय पातडीवर आदिवासी समाजाचे उच्च शिक्षित लोक असायला पाहिजे, तरच आपले आदिवासी समाज समोर जाऊ शकते. आणि तसेच आपले पारंपरिक हक्क, अधिकार , बोली भाषा, संस्कृती, रूढी, प्रता, परंपरा टिकविण्यासाठी व संवैधानिक हक्क,अधिकार मिळविण्यासाठी, आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी म्हणून संपूर्ण आदिवासी समाज एकत्र येऊन, संघटीत होऊन,संघर्ष केला पाहिजे. तसेच आपले गावातील भूमिया,गायता, पेरमा, वड्डे, मांजी इत्यादी प्रमुख लोकांना मान देऊन , त्याच्याकडून आदिवासी समाज बदल माहिती शिकून घेतला पाहिजे. इत्यादी विषयावर मान्यवरांनी वरील सर्व मान्यवरांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाचा मदो- मदी आदिवासी नाण्यावर नूर्त्या सुध्दा सादर करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे संचालन तिरु. वासुदेव कोडापे- कोडसेगुडाम( पेरमिली), यांनी केले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित तिरु. डॉ. गणेश मडावी साहेब ( मानसेवी वैद्यकीय अधिकारी पेरमिली), तिरु. निलेश वेलादी-( सरपंच मेडपल्ली), तिरु. मुत्ता मडावी-( सरपंच कुरुमपल्ली), तिरु. प्रमोद आत्राम- ( माजी सरपंच पेरमिली), तिरु. शंकर आत्राम- ( माजी उपसरपंच कमलापुर), तिरु. बाजीराव तलांडी- ( ग्रा.पं.सदस्य मेडपल्ली), तिरु. जिलकरशहा मडावी- ( माजी सरपंच दामरंचा), तिरु. ऍड. पंकज दाहगवकर- ( गडअहेरी), तिरु. बंडू आत्राम- (आलदांडी), तिरु. न्यानेश्वर सिडाम- ( पेरमिली), तिरु. रितेश आत्राम- ( पेरमिली), तिरु.संदीप गावडे- (पल्ले),तिरुमय सुमन मेश्राम- ( पेरमिली), पेरमिली पट्टीतील गाव पाटील- तिरु. संन्ना गावडे,तिरु.डोलू मडावी, तिरु. लच्या आत्राम, तिरु दामा गावडे तसेच पेरमिली ईलाका पट्टीतील सर्व भूमिया,गायता,पेरमा,वड्डे, स्थानिक आजी- माजी लोकप्रतिनिधी आणि पेरमिली पट्टीतील सर्व आदिवासी समाजातील महिला व पुरुष उपस्थिती होते.

Comments are closed.