Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हात महत्वाचे मार्ग बंद असल्याने प्रवाश्यांना बसत आहे फटका

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 19जुलै :- गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय. याचा फटका वाहतुकीवरही झाला आहे.जिल्हात महत्वाचे मार्ग बंद असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी 18 जुलै रोजी 10.9 मिलिमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झाली जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 क वरील आलापल्ली -सिरोंचा हा मार्ग हलक्या वाहनाकरिता सुरू झालेला असून या ठिकाणी नेंनतुर नाल्याजवळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे .त्याचप्रमाणे गडचिरोली गुरुवळा मार्ग सुरू झाला आहे , गडचिरोली -खेडी -सावली तसेच हरण घाट मार्ग सुरू झाले आहेत गडचिरोली पोटेगाव चामोर्शी, गडचिरोली मूल चामोर्शी,तळोधी आमगाव भाडभीडी, कोनसरी जामगिरी, पाखंजूर रंगी बोरी निमगाव सीताटोला मोडेपट्टी मुलचेरा हेटलकसा बोलेपल्ली हे मार्ग सुरू झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात हे मार्ग अद्यापही बंद आहेत त्यामध्ये ,आलापल्ली आष्टी मार्गावर बोरी नजीक दिना नदीच्या पुलावर पुराचे पाणी असल्याने बंद आहे,आरमोरी गडचिरोली या मार्गावर पाल नदी पाणी ओसंडूत वाहत असल्याने हा मार्ग बंद आहे त्याचप्रमाणे गडचिरोली ती चामोर्शी हा मार्ग शिवनी नाल्यामुळे बंद आहे धानोरा भाकरोंडी पिसेवडधा हा मार्ग सुद्धा बंद आहे वैरागड आरमोरी, आष्टी ते चंद्रपूर हा मार्ग जड वाहतुकीस बंद आहे अनखोडा तो कढोली, भेंडाळा बोरी जयरामपुर अनखोडा आल्लापल्ली ते भामरागड अहेरी बेजूरपल्ली परसेवाडा ,उमानूर मरपल्ली, देवलमरी- अहेरी देवलमरी -आवलमरी, आलापल्ली ते पेरमिली, किष्टापूर ते पत्तीगाव,बोरंपल्ली ते नेमडा हा मार्ग जड वाहतुकी करिता बंद आहे निजामाबाद सिरोंचा, जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. सीरोंचा कालेश्वरम ,झिंगानुर ते सिरकोंडा, लाहेरी ते बिना गुंडा हा मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद आहे. जिल्ह्यात महत्वाचे मार्ग बंद असल्याने प्रवाशांना याचा फटका बसत असून अनेक कामे खोळंबली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.