Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिंदेंच्या नातवाविषयी केलेल्या टिकेबाबत फडणवीस व्यथित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ७ ऑक्टोंबरदसरा मेळाव्यात अत्यंत खालच्या दर्जाचे तू तू मै मै दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून झाले दोन्ही मेळाव्याचे विचार नव्हताच तर आचार कुठे दिसणार?

दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळालं. शिवाजी पार्कवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि नातवावर देखील वक्तव्य केलं. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा अकोला पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका टिपण्णी ही खालच्या दर्जाची आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजे. या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. स्क्रिप्ट लिहिण्याची फॅशन झाली आहे. पण प्रकाश आंबेडकर यांची स्क्रिप्ट कोण लिहितो हे पाहावे लागेल असेही फडणवीस म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जलयुक्त शिवार योजनेबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जलयुक्त शिवार ही योजना आम्ही पुनर्जीवित करत आहे. गेल्या दोन अडीच वर्षात निर्णय झाले नसून आम्ही अविश्रांत काम करत असून शंभर दिवसात अनेक निर्णय घेतले आहेत’.

हे देखील वाचा : 

शंभर दिवसांचा कार्यकाळ हा आतापर्यंत जितके सरकार आले त्यापेक्षा प्रभावी आहे – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे उदघाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.