Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

राज्य सरकारने खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाचा परिपत्रक काढण्यात आला नव्हता. अखेर या निर्णयाचा परिपत्रक काढण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण या निर्णयाचा परिपत्रक  काढण्यात आला नव्हता. अखेर या निर्णयाचा परिपत्रक काढण्यात आला आहे. त्यामुळे या परिपत्रकानुसार आता २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात १५ टक्क्यांची फी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे त्यांना शाळेकडून १५ टक्के फी परत मिळनार असल्याने पालकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई डेस्क १७ ऑगस्ट : अखेर राज्य सरकारने अधिकृतपणे शासन निर्णय जारी केला आहे.सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिलेत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या १५ टक्के फी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. १५ टक्के फीमाफीच्या निर्णयाची अधिसूचना लवकरच काढण्यात येनार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होत. याबाबत अधिकृत निर्णय जारी होत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीका  केली होती.

महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे १५ टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. यावर ३ आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने २२ जुलै रोजी सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी व नेते वर्गाला दणका देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असं मत याचिकाकर्ते पालक जयश्री देशपांडे आणि प्रसाद तुळसकर यांनी व्यक्त केले आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.