Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पहिल्यांदाचा सेन्सेक्स ४४ हजार पार, निफ्टीत रेकॉर्ड ब्रेक वाढ.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क :- सध्या दररोज शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी जुने विक्रम तोडून नवे विक्रम करताना दिसत आहे. आठवड्यातच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सेन्सक्सने पहिल्यांदा ४४ हजार अंकांचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीही १३ हजारांच्या नव्या विक्रमा जवळ आला आहे. भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातील ही उच्च-स्तरीय पातळी आहे.

आजच्या सत्राला सुरुवात होताच भांडवली बाजार उच्चांकी पोहोचला. सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली. सेन्सेक्स ३५० अंशांनी वाढून ४४ हजारांच्या पार गेला आहे. सेन्सेक्समधील ही ऐतिहासिक वाढ ठरली आहे. तसेच सध्या निफ्टीमध्ये वाढ सुरुच आहे. निफ्टीत १०० अंशांची वाढ होऊन १२ हजार ८८० पर्यंत गेला आहे. आतापर्यंतचा हा निफ्टीचा उच्चांक ठरला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंगळवारी सुरुवातीला बीएसई निर्देशांकात वाढणाऱ्या शेअर्समध्ये टाटा स्टील, एअरटेल, एचडीएफसी बँक, एसबीआय, इंडसइंड बँक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएलचे शेअर्सचा समावेश आहे. काल (सोमवारी) शेअर बाजार बंद होता. पण काल अमेरिकेतील दुसरी आणि महत्त्वाची लस उत्पादक कंपनी मॉडर्नाने आपली लस ९४.५ टक्के प्रभावी ठरल्याचे जाहीर केले होते. त्यामुळेच जगभरातील भांडवली बाजारात मोठी तेजी दिसून आली, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारातही झाला आहे. आज दिवसा अखेर सेन्सेक्स 43,952 तर निफ्टी 12,874 बंद झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.