Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीज पडून एका इसमाचा मृत्यू !

लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क,

ब्रम्हपुरी दि, ९ जुलै : तालुक्यात येत असलेल्या अड्याळ गावातील तलावात मच्छी पकडताना वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली   आहे.वीज पडून मृत्यू झालेल्याचे नाव नारायण शिवराम कांबळी (45) असून चोरटी या गावातील रहिवासी आहे.

जिल्हात दोन-तीन दिवसापासून सतत पाऊस होत असल्याने नदी ,नाले तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात मच्छी येतात .याच आशेने मच्छी पकडायला तलावात गेले. मात्र  नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. याच दरम्यान अड्याळ गावातील तलावात मच्छी पकडत असताना सुमारे 4 च्या सुमारास मेघ गर्जनासह विजांचा कडकडाट मुसळधार पाऊस झाला आणि त्यातच मृतकावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. विज पडून मृत झाल्याची घटना माहिती होताच घटनास्थळी चोरटी गावातील ग्रामस्थ एकत्र येत घटनेची माहिती प्रशासनाला पाठवली असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतक नारायण यांच्या पश्चात परिवारात वडील, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतक हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अशातच वीज पडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे प्रशासनाने दुर्घटनाग्रस्त परिवारांना तात्काळ मदत मदत द्यावी अशी मागणी नागरिकात होताना समोर येत आहे.

हे देखील वाचा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

– https://youtube.com/watch?v=T2rAFKao3ls&feature=share

https://youtube.com/watch?v=6WajNTGzsvY&feature=share

 

Comments are closed.