Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू!

विद्यार्थिनीचा आज मृत्यू झाल्याने आदिवासी विकास विभागात एकच खळबळ उडाली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

पालघर, दि. ९ जुलै तलासरीतील झाई आश्रमशाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या सरिता भरत निमला (रा. झरी डोलारपाडा, वय 10) या विद्यार्थिनीचा आज मृत्यू झाल्याने आदिवासी विकास विभागात एकच खळबळ उडाली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालया अंतर्गत झाई येथे निवासी शाळा आहे . या शाळेतील अन्य काही विद्यार्थ्यांना देखील ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी ही लक्षणे आढळली आहेत. सकाळची न्याहारी केल्यानंतर सरिताची प्रकृती खालावली. शाळा प्रशासन तिला रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. डहाणूच्या आगर येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूच खरं कारण स्पष्ट होईल .

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

दूषित पाण्याने बाधा झालेल्यांना त्वरित चांगले उपचार द्या; मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वीज पडून एका इसमाचा मृत्यू !

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Comments are closed.