Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग!

जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दिनांक २० जानेवारी :  सागरी जैवविविधतेचे रक्षण करतांना  ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा लांजा मासा ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती ज्या मासेमारी करतांना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांना मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे. असे करतांना त्यांच्या झालेल्या जाळ्यांच्या नुकसानीपोटी कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना ४० लाख ७८ हजार ०५० रुपयांची नुकसानभरपाईही दिली आहे.

सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद- मुख्यमंत्री..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सागरी जैवविवितधेच्या रक्षणासाठी कांदळवन कक्ष करत असलेले काम कौतुकास्पद असूनअशाचप्रकारे राज्यातील जैवविविधतेच्या जपणूकीसाठी गांभीर्याने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे तसेच यासाठी आवश्यक असलेली व्यापक जनजागृती केली जावी, स्थानिकांना यासाठी विश्वासात घेऊन काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कांदळवन संरक्षणासाठी राज्य शासनाची महत्वाकांक्षी पाऊले- आदित्य ठाकरे

राज्यातील कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी शासनाने अतिशय महत्वाकांक्षी पाऊले टाकली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. ते म्हणाले की, यात कांदळवन उपजीविका निर्माण, कांदळवन वनीकरण, कांदळवन निसर्ग पर्यटन, कांदळवनावरील अतिक्रमणे हटवणे आणि इतर उपक्रमांचा समावेश आहे. राज्यात कांदळवनाचे ३२ हजार हेक्टर आच्छादन आहे. या समृद्ध कांदळवनाचे संरक्षण करतांना कांदळवनांना राखीव वनाचा दर्जा देण्याचे काम सुरु असून भारतीय वन अधिनियमातील कलम ४ नुसार २५१४.११ तर कलम २० अंतर्गत ९७८५.३६ हेक्टर इतके कांदळवन राखीव वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. एमएमआर क्षेत्रात कांदळवनांच्या संरक्षणासाठी संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे.. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून भारतीय वन सर्व्हेक्षण अहवाल २०२१ नुसार राज्यातील राज्यातील कांदळवन क्षेत्रात ४ चौ.कि.मीची वाढ झाली आहे, विविध शासकीय व खासगी विभागाकडील कांदळवने हस्तांतरीत करून घेण्याची प्रक्रिया अजूनही काही ठिकाणी सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सागरी प्रजातींच्या संरक्षणासाठीची उपाययोजना

सागरी जैवविविधतेच्या संवर्धनात स्थानिक मच्छिमारांचा नेहमीच महत्वाचा सहभाग राहिला असून शाश्वत मासेमारी करतांना दुर्मिळ आणि संरक्षित प्रजातींचे रक्षण होईल याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे यासाठी वन व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी संयुक्तरित्या नुकसानभरपाईची योजना डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात सुरुवात केली. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३८ ऑलिव्ह रिडले कासव, ६७ ग्रीन सी कासव, ५ हॉक्सबिल कासव, २ लेदरबॅक समुद्री कासव, ३७ बहिरी मासा (व्हेल शार्क), ६ लांजा (जाअंट गिटारफिश) एक गादा ( हंप ब्याक डॉल्फिन) ४ बुलीया (फिनलेस पोर्पोईस) अशा  २६० दुर्मिळ प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे

मागील १५ दिवसात

मागील पंधरा दिवसात अशा ३८ प्रकरणात ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम कांदळवनकक्षाकडून देण्यात आली आहे ज्यामध्ये २६ ऑलीव्ह रिडले कासव, ६ बहिरी मासे, २ लांजा मासे, १ ग्रीन सी कासव, १ हॉक्सबिल कासव व १ बुलीया यांना मच्छिमारांनी सुखरूप समुद्रात सोडले आहे. या आर्थिकवर्षात अशाप्रकारे ८६ प्रकरणात मच्छिमारांना ११ लाख ५२ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई कांदळवन कक्षामार्फत देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 

एसटी संपामुळे पगार नाही असं सांगून बाप आंदोलनात गेल्यावर पोरानं घेतला गळफास!

नक्षलग्रस्त जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष बाब म्हणून अधिकचा निधी देवू : उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीचे निकाल जाहीर

 

.

 

Comments are closed.