Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन 2022 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे.

शासनामध्ये मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरती करिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जेणेकरुन, आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे. असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चंद्रपूरात पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी द्वारे उपचार

जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!

१५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.