Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी उपविभागात जाणवले आज संध्याकाळच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के..

अहेरी उपविभागात जाणवले आज संध्याकाळच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,३१ ऑक्टोबर :  अहेरी उपविभागातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के  ६:५० वाजता जाणवले असून घरातील सर्वच घाबरून बाहेर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अहेरी उपविभागातील आष्टी, अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव,बोरी, राजाराम गावात भूकपांचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे अहेरी उपविभागात भूंकपाचे केंद्र असावे असे स्थानिकाचे मत असून परिसरात भितीचे वातावरण निर्माण  झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आली असून किती रिश्टर चा  आहे हे स्पष्ठ झाले नाही.

स्रोत: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, GOI. 77 किमी खोलीसह 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अक्षांश 19.00 आणि रेखांश 79.96, अहवाल वेळ 18:48:47 (IST).

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ), सिरोंचा तालुका-अक्षांश आणि रेखांशानुसार केंद्राची नोंद आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कृपया कोणतीही दहशत आणि भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त होताच अधिकृत अहवाल दिला जाईल.
संजय मीणा
जिल्हाधिकारी, गडचिरोली

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे अभिवादन.

आदीवासिंची परंपरा,संस्कृती टिकण्यासाठी पारंपरिक नाच गाणे मेळावे गरजेचे . विवेक पंडित

 

Comments are closed.