Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २४ मे : नक्षल्यांनी एका इसमाची लाकड़ी दांडुक्याने मारहाण करुण गळा दाबुन हत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेल्या मृतकाचे नाव कुल्ले वजा कोवासी (४२) असून डोड्डूर येथील रहिवासी आणि गाव पाटिल  असल्याची माहिती पोलिस विभागानी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्हाभरात सध्या तेंदू संकलनाचे हंगाम जोरात सुरु असुन मृतक हे तेंदू संकलन  केंद्रावर परिवारानी तेंदू संकलन केलेले मुळके(पुले) विकण्यासाठी दी,२३ में च्या रात्री नऊ वाजता उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान मृतक तेंदू संकलन केंद्रावर उपस्थित असावा याची भनक नक्षल्यांना लागताच खातरजमा करुण ३५ ते ४० नक्षल तेंदू संकलन केंद्र गाठुन कुल्ले वजा कोवासी यांच्ये अपहरण करुण डोड्डूर ते वटेलीच्या कच्या रस्त्यावर दांडूकाने मारहाण करीत गळा दाबुन हत्या केली आहे.

नक्षल्यानी हत्या करण्याचे कारण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे, नैनवाड़ी ते रेंगेटोला दरम्यान नवनिर्माण रस्त्याचे बांधकाम सुरु होते आणी त्या रस्त्याच्या विकास कामाला नक्षल्यांचा विरोध असल्याने रस्ता बंद करण्याचे फर्मान सोडले होते . मात्र मृतक हे गाव विकासाच्या कामासाठी कटिबद्ध असून गांव  पाटिल होते. त्यामुळे मृतकानी नक्षल्यांच्या विरोधाला भिक न घालता स्वता पुढाकार घेत नैनवाड़ी ते रेंगेटोला रस्त्याच्या बॉन्धकाम सुरु ठेवले होते. त्यामुळे बिथरलेल्या नक्षल्यांनी मृतक पाटलाचा वचपा काढण्याचा निश्चय करुण हत्या केली असल्याचे लोकस्पर्श न्यूजला पोलिसांनी सांगितले.

नक्षल्यांची अपहरण करून हत्या केल्याची घटनेची माहिती पोलिस मदत केंद्र जभिया गट्टा येथे मृतकाचा मुलगा किशोर कुल्ले कोवासी  आणि गावातील नागरिकांना तक्रार दाखल केली. त्यावेळी पोलिस विभागांनी मृतकाच्या परिवारांना व गावकऱ्यांना आधार देत घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करून मृतकाचे शव ताब्यात घेवून ग्रामीण रुग्णालय एटापली येथे शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आले आहे.

नक्षल्यांनी सध्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मे महिन्यातच दोनं निरपराध आदिवासींची हत्या आणि नवनिर्माण रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याने दुर्गम भागातिल नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा : 

रवीची ‘सोशल’ इंजिनिअरिंग !

आता आंबेडकरवाद नव्याने सांगण्याची गरज – डॉ. बबन जोगदंड

Comments are closed.