Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी हत्या

हॉटेलमध्ये दोघांनी भोसकून केली हत्या, हल्लेखोर घटनास्थळावरून झाले प्रसार..

कर्नाटक ६ जुलै :- कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचे वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेलच्या रिसेप्शनजवळ त्यांची चाकूनं वार करत हत्या केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची आज मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले.

Comments are closed.