Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वृक्षलागवड सप्ताहानिमित्त वृक्ष दिंडी व सायकल रॅलीचे आयोजन

एक विद्यार्थी, एक वृक्ष या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक झाड लावून ते जगवण्यासाठी प्रयत्न

लोकस्पर्श न्यू नेटवर्क,

गडचिरोली ५ जुलै २०२२:- गडचिरोली  वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण, गडचिरोली व विद्याभारती कन्या विद्यालय, गडचिरोली यांच्या मार्फत वृक्ष दिंडी, सायकल रॅली व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पर्यावरणाचे रक्षण व वनांचे संरक्षण याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, विद्याभारती कन्या विद्यालयामधील विद्यार्थीनी, शिक्षक व वनविभागाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने गडचिरोली शहरात वृक्षदिंडी व सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष प्रतिज्ञा घेऊन विद्यालयाच्या आवारात शिक्षकां सोबत वृक्षलागवड केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एक विद्यार्थी, एक वृक्ष या संकल्पनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान एक झाड लावून ते जगवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत श्री. धीरज ढेंबरे, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनिकरण, गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने कु. शितल खुळसंगे मॅडम तसेच कन्या शाळेचे पर्यवेक्षक श्री. मुनघाटे सर यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. वासेकर, वनपाल कु विद्या देठे, वनपाल व वनरक्षक कु. मेश्राम मॅडम, मनोज पिपरे, अनिल राऊत यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. चुलबुले, यांनी केले तर सांगता श्री. नितेश सोमलकर, कार्यालयीन लिपिक यांनी शिक्षक व कर्मचारी वर्गाचे आभार मानून केली.

Comments are closed.