Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई महापालिकेवरून आमदार सरवणकरांचे गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांची चौकशीची घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २५ ऑगस्ट : मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं, या विधेयकामुळे आता मुंबई महापालिकेच्या वॉर्डची संख्या पुन्हा एकदा २२७ एवढी होणार आहे. महाविकासआघाडी सरकार असताना मुंबई महापालिका वॉर्डची संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली होती. शिवसेनेने आपल्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपसह काँग्रेसनेही केला होता. आता शिंदे सरकारने हे विधेयक मंजूर करताना काँग्रेसनेही पाठिंबा दिला.

दरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी वॉर्ड पुनर्ररचनेवरून खळबळजनक आरोप केले. वॉर्ड बदलण्याचा सर्वात पहिला फटका मला बसला. मी यासंदर्भात शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना बोललो की माझा अर्धा दादर तोडून वरळीला जोडलं गेलं. मला सांगण्यात आलं कोर्टात जायच नाही. मी काय करायचं होतं? हे वॉर्ड तोडत असताना अर्थिक व्यवहार झाले. या सर्व प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी सरवणकर यांनी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदा सरवणकर यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली, तसंच या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘महाराष्ट्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर आरटीओ करणार कारवाई

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.