Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुपरस्टार अभिनेता सलमान खान ला सर्पदंश.

सलमान खान याच्या फार्म हाऊस येथील घटना कळंबोली एमजीएम रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

रायगड दि,२६ डिसेंबर :-रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वाझे येथील सलमान खान याच्या फार्म हाऊस येथे अभिनेता सलमान खानला सर्पदंश झाल्याची घटना असून कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात सलमान खानवर उपचार करून त्याला सोडण्यात आले आहे.

सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान दरवर्षीप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊस मध्ये आला असताना शनिवारी दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी सलमान खानला सर्पदंश झाला. यावेळी तात्काळ कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल होऊन तसेच डॉक्टरांकडून उपचार करून सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पनवेल तालुक्यातील नेरे गावच्या जवळ वाजे हे गाव असून या ठिकाणी सिनेअभिनेता सलमान खान यांचा अर्पिता नावाचा फार्म हाऊस आहे . निसर्गाचे सानिध्य त्याचबरोबर थंड आणि अतिशय निरामय ठिकाण असलेल्या या ठिकाणी खान कुटुंबिय सुट्टी त्याचबरोबर सेलिब्रेशन – साजरा करण्यासाठी येतात. हा फार्म हाऊस म्हणजे त्याचे आवडीचे ठिकाण असल्याने सलमान आपला वाढदिवस येथेच साजरा करीत आहेत. दरवर्षीप्रमाणे सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊमध्ये आला असताना शनिवारी मध्यरात्री अचानकपणे सर्पदंश झाला.

यावेळी उपचाराकरिता कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार्थ दाखल झाले असून डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन खाजगी डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा 

‘पढेगा भारत’ जिओटीव्ही एज्युकेशन चॅनेलचे उद्घाटन

कोरोनाच्या मृत यादीतील एक व्यक्ती जिवंत, प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर!

आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दाखवा -आनंदराज आंबेडकरांचे क्रांतीभुमीतुन अवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.