Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २२ ऑगस्ट: शाळक विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सर्व जखमी विद्यार्थ्यांना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील बसचा लगाम मार्गावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान, सुरजागड खाणीतील लोहखनीजाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

आज सकाळी अहेरी आगारातून शालेय विद्यार्थ्यांकरिता मानव मिशन विकास अंतर्गत बस क्रमांक एमएच ०७ सी ९४६५ ही बस अहेरी-लगाम-मुलचेरा परिसरातील विध्यार्थ्यांना घेऊन जात असताना नाल्याजवळ येताच मठ्या खड्ड्यांमुळे चालाचे नियंत्रण सुटले आणि बस झाडावर जाऊन आदळली. या बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. यापैकी काही विद्यार्थी आणि वाहक गंभीर जखमी
झाले असून त्यांना उपचाराकरिता मुलचेरा ग्रामीण
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

https://youtube.com/watch?v=KqJxrFm-Egw&feature=share

https://loksparsh.com/maharashtra/immediately-repair-the-road-from-alapali-to-ashti-within-7-days/29068/

गाव पाड्यातील रस्ते मुख्य रस्त्याशी जोडले जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.