Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धावत्या कार समोर येऊन एसटी चालकानी केली आत्महत्या!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नंदुरबार, दि. १६ जानेवारी : अकोट तालुक्यातील देवरी फाट्या नजीक एसटी चालकाने धावत्या कार समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी  ७:३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

अरविंद अनंत चव्हाण (४०) रा.देवरी) असे मृतकाचे नाव असून ते शहादा डेपो (जिल्हा नंदुरबार) येथे एसटी चालक म्हणून नोकरीला होते. सदर कर्मचारी हा मागील पाच ते सहा महिन्यांपासून मानसिक आजाराखाली असल्याचे समजते. या कर्मचाऱ्याला एसटी खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतक अरविंद चव्हाण यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने तो दररोज इतरत्र फिरत असे. आज रोजी त्याने एका धावत्या वाहना समोर उडी घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अरविंद चव्हाण गंभीर जखमी झाले.

ज्या वाहनसमोर अरविंद चव्हाण यांनी उडी घेतली त्याच वाहनातून त्यांना पुढील उपचारासाठी अकोट येथे दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

 

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.