Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात २८ नोव्हें शुक्रवारपासून कापूस खरेदी केंद्रे सुरु.

या वर्षी 1 कोटी 78 लाख क्विंटल इतकी धान खरेदी होण्याची शक्यता व्यक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क २५ नोव्हेंबर :- राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीस सुरुवात होत आहे. यासंदर्भात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत पणन विभागाचे प्रधान सचिव यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवारपासून (27 नोव्हेंबर) एकूण 16 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 21 केंद्रांमध्ये तसेच 33 जिनिंग मिलमध्ये कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड, परभणी आणि जळगाव अशा 3 जिल्ह्यांत एकूण 9 कापूस खरेदी केंद्रे डिसेंबर 2020 च्या पहिल्या आठवडयामध्ये सुरु होणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रधान सचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 42.86 लाख हेक्टरमध्ये कापूस पेरा झालेला आहे. या वर्षी 450 लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय कापूस खरेदी निगम (CCI) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ यांच्यातर्फे खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे.

Comments are closed.