Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई डेस्क २७ फेब्रुवारी : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपा महिला मोर्चाच्यावतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. भाजपाने राज्य सरकारला धारेवर धरले असुन, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून पावलं उचचली जात असुन, संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कुणाकडूनही अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.