Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीची weather impact; सोनिया आणि राहुल गांधींचा मुक्काम आता गोव्यात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क: दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. दिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. त्यानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील.

जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांना छातीमधील संसर्गाची समस्या जाणवत आहे. यासाठी सोनिया गांधी सध्या औषधांचा हेवी डोस घेत आहेत. सप्टेंबर महिन्यात त्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या. तेव्हादेखील राहुल गांधीही त्यांच्यासोबत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र, यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.