Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत कोरिनाबाधितांची संख्या वाढतीवर, 77 नवीन कोरोना बाधित तर 58 कोरोनामुक्त.

1 मृत्यू गडचिरोली तालुक्यातील रामनगर येथील 61 वर्षीय पुरुष .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २० नोव्हें :- आज जिल्हयात 77 नवीन बाधित आढळून आले. तर आज 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7206 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6619 वर पोहचली. तसेच सद्या 512 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 75 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. 1 नवीन मृत्यू मध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर येथील 61 वर्षीय पुरुष असून ते हायपरटेंशनने ग्रस्त होते. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.85 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 7.11 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 77 बाधितांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 4, आरमोरी 9, भामरागड 3, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 2, कोरची 0, कुरखेडा 5, मुलचेरा 2, सिरोंचा 1 व वडसा येथील 9 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 58 रूग्णांमध्ये गडचिरोली 28, अहेरी 13, आरमोरी 3, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 2, एटापल्ली 1, मुलचेरा 2, सिरोंचा 3, कोरची 2, कुरखेडा 1 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकुलनगर 4, गांधी वार्ड 1, पुलकल 1, स्थानिक 7, टी पॉईंट चौक 1, मथुरानगर 2, साईनगर 2, कॅम्प एरिया 2, कनेरी 1, रामपुरी 1, पोलीस कॉलनी 1, उरकुडे शाळेजवळ 1, रामनगर 1, टिचर कॉलनी 2, आयटीआय चौक 2, आशिर्वाद नगर 1, कोटगल 1, पारडी 1, वनश्री कॉलनी 1, सर्वोदय वार्ड 1, खुरसा 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये पोलिस स्टेशन 1, स्थानिक 2, आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 9, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये पीएस 3, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये खुटगाव 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक (पोलिस) 1, जारावंडी 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये शिवनी 1, स्थानिक 1, मानापुर 1, देऊळगांव 1, चिखली 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये देशबरधुग्राम 1, सुंदरनगर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, पोलिस स्टेशन 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये टीएचओ कार्यालय 1, भगतसिंग वार्ड 1, बोलधा 2, ए, ई, एच 1, के व्ही कोरेगाव 3, कुरुड 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.