Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वोडाफोन-आयडियाचा ( VI ) स्वस्त प्लान. रिलायन्स जिओ चांगला टक्कर .

३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत जास्त मोठी वैधता देणारे दोन प्लान कंपनीकडे आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्कः- वोडाफोन-आयडिया स्वस्त किंमतीत मोठी वैधता देणारे प्रीपेड प्लान लागोपाठ आणत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये टॅरिफमध्ये वाढ केल्याच्या आधी वोडाफोनकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ८४ दिवसांची वैधता मिळणारे प्लान ऑफर करीत होती. तसेच वोडाफोनकडे २६९ रुपयांचा प्लान सुद्धा होता. ज्यात युजर्संना ५६ दिवसांची वैधता मिळत होती. वोडाफोनचा हा प्लान अजूनही उपलब्ध आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये युजर्संना जीबी डेटा मिळतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२६९ प्लानमध्ये मिळते ५६ दिवसांची वैधता

वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लिमिटेड एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. या प्रीपेड प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये युजर्संना ४ जीबी डेटा मिळतो. तसेच युजर्संना दर महिन्याला ६०० एसएमएस पाठवता येवू शकतात. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओकडे ३०० रुपयांपेक्षा असा कोणताही प्लान नाही. दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर जवळ इतकी मोठी वैधता असलेला प्लान नाही. वोडाफोन आयडियाकडे मोठी वैधता असलेले अनेक स्वस्त प्लान आहेत.प्लानमध्ये युजर्संना देशात कुठेही नेटवर्क्सवर अनलिमिटेड लोकल व नॅशनल कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच वोडाफोन-आयडियाकडे ९५ रुपयांचा सर्विस वैधता पॅक आहे. जो ७४ रुपयांचा टॉक टाइम आणि २०० एमबी डेटा ऑफर करतो. एकूण वोडाफोन आयडियाकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ५६ दिवसांची वैधता देणारे दोन प्लान्स आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१४८ रुपयांचा प्लान आता दिल्लीत उपलब्ध
तसेच वोडाफोन-आयडियाने नुकताच लाँच केलेला १४८ रुपयांचा प्रीपेड प्लानला दिल्लीत उपलब्ध केले आहे. ओन्लीटेक च्या रिपोर्टनुसार, हा प्रीपेड प्लान लाइव झाला आहे. वोडाफोन-आयडियाच्या १४८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानची वैधता १८ दिवसांची आहे. यात रोज १ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो.

Comments are closed.