महाराष्ट्रात एक अशी सरकार आहे जी आपल्याच घोषणावर अमल करीत नाही – देवेन्द्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई 20 नोव्हें :- महाराष्ट्रात एक अशी सरकार आहे जी आपल्याच घोषणावर अमल करीत नाही हे पलटू राम लोक आहेत असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केले . नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गट, बहूजन रिपब्लिकन एकता मंच व खोरीपा यांचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ नागपुरातील हिरवी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते पूढे ते म्हणाले हा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा गढ मानला जातो भारतीय जनता पार्टी येथून कधीही पराजीत झालेली नाही या मतदार संघाच नेतृत्व सध्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले आहे या मतदार संघातून ते आमदार होते त्यांनी महाराष्ट्राचे मंत्री आणि विरोधी पक्ष नेता म्हणून देखिल कार्य केले हा मतदार संघ नितीन गडकरी यांच्या नावाने ओळखला जातो असेही ते म्हणाले.
या सरकार जवळ एकच एजेंडा आहे रोज ट्रान्स्फर करा व माल कमवा . ट्रान्स्फर मध्ये पैसे कमवा हे एकमेव काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे असेही ते म्हणाले प्रत्येक क्षेत्रात भ्रष्ट्राचार सुरू आहे असेही ते म्हणाले. विकासाचा एकही काम राज्य सरकार कडून सुरू नाही असेही ते म्हणाले, विदर्भाप्रती या सरकारला राग आहे हे असे मुख्यमंत्री आहेत जे 2020 मध्ये विदर्भात आलेच नाही विदर्भासाठी, शेतक-यांसाठी निर्णय घेतला नाही असेही ते म्हणाले मुख्यमंत्री हे मुंबईचे आहेत महाराष्ट्राचे नाही असा टोलाही त्यांनी लगावला या निवडणूकीत त्यांना करंटचा झटका दया असेही ते म्हणाले.
Comments are closed.