Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी… MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर,

MPSC च्या विद्यार्थ्यांना संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलीय. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षेच्या आयोजनास परवानगी दिली आहे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क 4 ऑगस्ट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभाग आयोजित परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा कालावधी लांबणीवर.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या मार्च महिन्या मध्ये घेतलेल्या  राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Comments are closed.