मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, लोकलमधून प्रवासाची मुभा.
रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :- रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करताना वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.ओळखपत्र असल्याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई व उपनगरांत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक, शिक्षिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासासाठी मुभा देण्याची विनंती केली होती. त्यांनी याबबत ट्विट केलं होते.
राज्य सरकारतर्फे 6 नोव्हेंबरला रेल्वेला पत्र लिहीले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांना किशोरराजे निंबाळकर यांनी पत्र लिहीले होते. दरम्यान, महाराष्ट्रात 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांसंबधी एसओपी जारी केली आहे.
Comments are closed.