Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संतोष देशमुख हत्या प्रकरण: सर्व आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

बीड: बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी कडून 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल, तसंच न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात चर्चेदरम्यान सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सध्या या आरोपीवर मोक्का अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया सुरु असून, आरोपी विष्णू चाटे यानं एक दिवस आधी आरोपीची भेट घेतली होती. विष्णू चाटे याची न्यायालयीन चौकशी होणार आहे. या हत्येचा कट विष्णू चाटे आणि आरोपीन केल्याचं समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ही कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या सर्व आरोपींंवर मोक्का कायद्याअंतर्गत अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोक्का कधी लावला जातो?

अपहरण,खंडणी, हत्या,अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही. जेव्हा गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक, म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लावला जातो. मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येते नाही. पण मोक्का लागत नाही आणि अशावेळी मोक्का लावण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्दशनात आणून दिल्यास जामीन मिळतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.