Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गरिबांचा फ्रिज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विशेष प्रतिनिधी – के. सचिनकुमार

गडचिरोली, दि. २८ फेब्रुवारी : उन्हाळ्याची सुरवात होताच उन्हाची तीव्रता जास्त वाढल्याने अनेकांना थंडगार पाण्याची गरज भासते, या सर्व सामान्य माणसाच्या मनात घर करून असलेला व कमीतकमी किंमतीमध्ये गरिबांचा फ्रीज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांची ओढ लागली असते. सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा माठ १००, १५०, रु. ते ५०० रुपयांपर्यंत मिळतोय. अनेक माठावर नक्षीकाम केलेले आहे. बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध सुद्धा आहे. अनेक ठिकाणी परप्रांतातून नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कोरोना महामारीच्या काळात मोठमोठ्या उद्योगधंदे, लघु उद्योगावर तसेच हाथ मजुरी करणाऱ्यांंना या महामारीच्या काळात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले होते. मात्र आता ही परिस्थिती काहीतरी प्रमाणात आटोक्यात आली आहे. २ वर्षानंतर बाजारपेठ, व्यवसाय, उद्योगधंदे सुरू झाले आहेत. त्यामध्ये लहान सहान हातावर व्यवसाय करणारे व्यावसायिक आता कामाला लागले आहेत. काही दिवसांपासून जास्त प्रमाणात उन्हाची तीव्रता भासत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…

गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द : जिल्हाधिकारी संजय मीणा

 

 

 

 

 

Comments are closed.