Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भावी पिढीच्या निर्माणासाठी संतांची शिकवण ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

औरंगाबाद , दि. २८ फेब्रुवारी : भारत देशाला गुरु शिष्य परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. आर्य चाणक्य – सम्राट चंद्रगुप्त मौर्य व समर्थ रामदास स्वामी – छत्रपती शिवाजी महाराज ही या परंपरेची उदाहरण आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापना करु शकले. असा दावा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला.

भावी पिढीच्या उत्थानासाठी, निर्माणासाठी संतांच्या शिकवणीचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या समारोप प्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद येथे २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संतांच्या शिकवणीमुळे सदाचार व दुराचारातील फरक कळतो, सदाचारी ताकदवान जरी असले तरी ते आपल्यापेक्षा लहानांवर आक्रमण करीत नाही अशी अप्रत्यक्ष टिका नामोल्लेख न करता रशिया – युक्रेन युद्धावर केली. रावण हा शक्तीशाली होता मात्र दुराचारी होता म्हणुनच सदाचारी रामाने त्याचा पराभव केला. असे उदाहरण दिले.

राष्ट्र व समाज निर्माण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे व याच्या जडणघडणीत संत महात्म्यांची शिकवण ही प्रेरणादायी असते असे मत त्यांनी व्यक्त केले. आज मराठी राजभाषा दिवस आहे. ज्ञानेश्वरांपासून मराठी भाषेला संत साहित्याची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये समर्थ रामदासांच्या साहित्याचे स्थान महत्वाचे आहे. समर्थांनी, “प्रभाते मनी राम चिंतीत जावा”, “मना सज्जना भक्ती पंथेची जावे”, “जनी निंदते ते सोडूनी द्यावे” या आणि यासारख्या एकापेक्षा एक सरस रचनेतून मानवी जीवनात सदाचाराचे असलेले महत्व वारंवार अधोरेखीत केलेले आहे. त्यांची सर्व संत वचने आजच्या काळात प्राधान्याने आचरणात आणण्याची गरज असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या एकदिवसीय श्री समर्थ रामदास स्वामी साहित्य परिषदेच्या यशस्वी आयोजनाठी संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठान औरंगाबाद, श्री समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद, श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, श्री समर्थ मंदिर संस्थान जांब, श्री गणेश सभा, श्री एकनाथ संशोधन मंदिर या संयोजक संस्थांनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा : 

अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…

गरिबांचा फ्रिज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध…

10 वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी

 

 

Comments are closed.