Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कचरा संकलन कंत्राटात भ्रष्‍टाचार,आरोपांची होणार चौकशी. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

वरोरा येथे शिवसेनेच्या मेळाव्यात ते आले असताना प्रकरणाविषयी ते बोलत होते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपुर दि 13 जानेवारी :- चंद्रपूर महानगरपालिकेचे कचरा संकलन वादग्रस्त ठरले असून स्वयंभू नामक कंपनीला आधीचे कंत्राट रद्द करून जास्त दरात कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यावर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वरोरा येथे शिवसेनेच्या मेळाव्यात ते आले असताना प्रकरणाविषयी ते बोलत होते. चंद्रपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन कंत्राटदाराची तक्रार प्राप्त झालेली असून या दृष्टीने नगर विकास खात्याच्या माध्यमातून पाहानी सुरू आहे. जर कचरा संकलनात भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले तर नक्कीच त्यावर कारवाई करणार असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

कचरा घोटाळा प्रकरणा विषयी अधिक माहिती पाहुया

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरुवातीच्या कचरा संकलन कंपनीचा कंत्राट कालावधी पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कचरा संकलनाच्या संबंधात निविदा मागवण्यात आल्या होत्या . यामध्ये सहापैकी दोन कंपन्या तांत्रिक दृष्टीने बाद झाल्याने चार कंपन्या पात्र ठरल्या यामध्ये पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीने सर्वात कमी म्हणजेच 1700 रुपये प्रति टन कचरा यानुसार कंपनीने कीमत लावली.

कपनीचे सर्व आर्थिक गणित जुळवू या कंत्राटी पदभरती मात्र इतक्या कमी किमतीत हे काम होऊ शकत नाही . हे कंपनीच्या आधी स्थायी समितीला कळालं. त्यामुळे समितीने ही निविदा रद्द केली त्यानंतर पुन्हा ऑक्टोंबर महिन्यात नवीन नव्याने निविदा मागविण्यात आल्या त्यावेळी या कंपनीला 25 रुपये प्रति टन या प्रमाणे कचरा संकलनाचे कंत्राट देण्याला मंजुरी देण्यात आली .

सुविधा आणि कामगार कायद्यानुसार कामगारांचे वेतन याबाबत समोर ठेवून त्या पैशाचा उपयोग झाला. अशा वेळी कंपनीला अवघड असते मात्र या कंपनीने पुन्हा संधी देण्यात आली. आणि ह्या वेळी 25 प्रमाणे त्यांना काम देण्यात आले त्यामुळे त्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थाई समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप केलेला होता . शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी याबाबतची तक्रार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती . या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती . एकनाथ शिंदे यापूर्वीही चंद्रपुरात आले असता यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी दुसर्यादा स्पष्ट या विषयी प्रतिक्रिया दिली असून यासंदर्भात अभ्यासपूर्ण चौकशी चालू आहे. जर या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले तर नक्कीच कारवाई करून यात कोणालाही सोडलं जाणार नाही . अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.