Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री साहेब, मला नोकरी द्या नाही तर पोरगी पाहून माझे लग्न करून द्या!

वऱ्हाडातील वाशिमच्या गजानन राठोड या युवकाने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांना भन्नाट पत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशीम, दि. १३ जानेवारी: कोरोना प्रादुर्भाव आणि त्यानंतरचा देशव्यापी लॉकडाउन यामुळे देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा काळात बेरोजगार तरुणांची काय अवस्था होऊ शकते. याचं उदाहरण नुकतचं समोर आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वाशिमच्या एका तरुणानं एक अजब मागणी केली आहे. ‘सरकारी नोकर भरती काढावी अथवा एखादी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्यावं,’ अशी अजब मागणी या तरुणानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानं एक पत्र लिहून ही मागणी मुख्यमंत्र्यापुढं मांडली असून हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साहेब मला नोकरी द्या नाहीतर, एखादी पोरगी पाहून माझं लग्न लावून द्या, माझं वय 35 वर्ष झालं आहे. अद्याप माझं लग्न झालेलं नाही. मी मागील 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. पण मला अजूनही सरकारी नोकरी मिळाली नाही. ज्या ज्या ठिकाणी लग्नासाठी मुलगी बघायला जातो. तिथं एकच मागणी असते, मुलगा सरकारी नोकरीवाला पाहिजे. पण तुम्ही आतापर्यंत सरकारी नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळं मला सरकारी नोकरी मिळणं कठीण झालं आहे. अशा शब्दांत वाशिमच्या तरुणांनं त्याची खंत व्यक्त केली आहे.

संपूर्ण देशासह राज्यामध्ये वाढत असलेल्या बेरोजगारीच्या समस्येला वाशिम जिल्ह्यातील सोंडा या गावच्या गजानन राठोड ह्या युवकाने तोंड फोडत चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून “मला नौकरी द्या अथवा माझ्यासाठी मुलगी पाहून माझं लग्न लावून द्या अशी मागणी करीत बेरोजगारीची समस्या  जगासमोर मांडल्याने जिल्ह्यातील युवक वर्गामध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या युवकाची घरची परिस्थिती हलाखीची असून घरी फक्त एक हेक्टर कोरडवाहू शेती आहे. मोठा भाऊ परिवारासह पश्चिम महाराष्ट्र मध्ये ऊसतोड साठी गेला आहे. आई वडील शिक्षणासाठी मुलाला १ हजार रुपये पाठवितात, त्यात तो ५०० रुपये रूम भाडे आणि ५०० रु. मेसचे देत. विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. कमी शेती आणि नसलेली नोकरी यामुळे त्याला कोणी मुलगी ही देत नाही.

Comments are closed.