मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कामकाजाला प्रारंभ
महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 7 जुलै :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. मुख्यमंत्री मंत्रालयातील दालनात येणार म्हणून आज आकर्षक सजावट केली होती. त्यानंतर रितसर पूजा पार पडल्यानंतर मुख्मयंत्र्यांनी कामकाजास सुरुवात केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. त्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.रुवात केली.याप्रसंगी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता, मुलगा श्रीकांत, सून वृषाली तसेच नातू रुद्रांश असे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
Comments are closed.