Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भंडारा मृत बालकांच्या कुटूंबियांना राज्यपाल कडून दोन लाखाची मदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

राज्यपालांनी केली रुग्णालयातील अपघातग्रस्त कक्षाची पाहणी.

भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भंडारा 13 जानेवारी:- जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात झालेल्या दुर्दैवी अपघातात दहा चिमुकल्यांचा जीव गेला होता. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दुःख व्यक्त केले होते. राज्यपालांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्त कक्षाची पाहणी केली. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथील सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले.

गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यु झाला होता. तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देवून शिशूंच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक व मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव आदी उपस्थित होते.

( हे पण वाचा:- धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला आघाडी आक्रमक)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.