Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चुकीच्या पद्धतीने लिलाव करून जनावरे कसायाच्या घशात टाकण्यास जबाबदार कोण?

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली २० ऑगस्ट :जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात आली. यानंतर जनावरांना कोंडवाड्यात ठेऊन कोणतीही पूर्वतयारी न करता जनावरांचा लिलाव करण्यात आला व जनावरे कसायांच्या तावडीत देण्यात आली. या प्रकाराचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत असून याला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, पीपल फॉर एनवरनमेन्ट अँड एनिमल वेल्फेअर ने गडचिरोली न.प.च्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर नगर परिषदेने ३५ जनावरांना पकडून लांजेडा येथिल कोंडवड्यात टाकले होते. यानंतर १२ ऑगस्ट रोजी या जनावरांचा लिलाव करण्यात आला. परंतु ही जनावरे कसायांना विकण्यात आल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जनावरे कोणत्या दिवशी कोंडवाड्यात टाकण्यात आली, जनावरांचा लिलाव किती दिवसांनी करण्यात आला, लिलाव करण्या आधी दवंडी, नोटीस किंवा कोणाला माहिती देण्यात आली का, जनावरांची आरोग्य तपासणी करण्यात आली का, लिलावात शेतकरी किंवा पशुपालकांनी सहभाग घेतला काय, लिलावात सहभागी व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जनावरांना टेम्पो मध्ये भरून का नेले, जनावरांना वाहून नेण्याची परवानगी कोणी दिली याची तपासणी केली का असे प्रश्न आता पीपल फॉर एनवरनमेन्ट अँड एनिमल वेल्फेअर या संस्थेने उपस्थित केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा :

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

एका मृत्युसह गडचिरोली जिल्ह्यात 3 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

 

 

 

शासनाकडून कोविडमूळे शालेय फी बाबत दिलेल्या आदेशाचे सनियंत्रण करण्याची शिक्षण विभागाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी दिले लेखी आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.