Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज 39 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त

सद्या 203 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,11 मार्च:- आज जिल्हयात 39 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9796 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9485 वर पोहचली. तसेच सद्या 203 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.07 टक्के तर मृत्यू दर 1.10 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 39 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 22, अहेरी तालुक्यातील 2, आरमोरी तालुक्यातील 8, सिरोंचा तालुक्यातील 1, तर वडसा तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 9 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 7, चामोर्शी 1, व कुरखेडा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील झेडपी क्वार्टर 1, सोनापुर कॉम्पलेक्स 1, वनश्री कॉलनी 1, कन्नमवारनगर 2, रामनगर 1, गोकुलनगर 2, किसन विद्यालय जेप्रा 3, इंग्रजी आश्रम शाळा आनंदनगर 1, स्थानिक 1, अमिर्झा 1, राणी दुर्गावती होस्टेल 5, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, नागेपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये जोगीसाखरा 2, स्थानिक 2, वैरागड 1, कलामटोला 2, देऊळगाव 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये दुनालकुंडा 1, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 1, सीआरपीएफ कॅम्प 3, हनुमान वार्ड 2, तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 3 जणांचा समावेश आहे.

Comments are closed.