Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला जत्रेचे स्वरूप, पंढरपुर पोलिसात गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २२ मार्च: मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचार विनिमय बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ५० हून अधिक लोकांची गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भाने

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पंढरपुर मधील श्रीयश पॅलेस येथे विचार विनिमय बैठक पार पडली. त्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप औदुंबर मांडवे यांनी परवानगी घेतली होती. त्यानुसार त्यांना कोविड-१९ च्या अटी व शर्तीच्या नियमानुसार परवानगी मिळाली होती. मात्र फक्त ५० लोक हे या बैठकीला उपस्थित राहतील अशी लेखी सूचना देऊन परवानगी देण्यात आली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मात्र या बैठकीस ५० हून अधिक लोक जमले. यामुळे पंचायत समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथकाने संदीप मांडवे यांच्याविरुद्ध कलम १८८ भादवि अन्वये तक्रार पंढरपुर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. आता नेत्यांच्या बैठकीमध्ये एवढी गर्दी तर सभेला काय होणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Comments are closed.