Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात १३ मृत्युसह आज १२३५ नवीन कोरोना बाधितांची नोंद तर ३३२ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 28,780 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 7439

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १४ एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 332 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1235 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 13 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 36 हजार 748 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 780 झाली आहे. सध्या 7439 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 12 हजार 440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 69 हजार 973 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये  चंद्रपूर शहरातील 35 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष तसेच श्रीराम वार्ड येथील 70 वर्षीय महिला, झाकीर हुसेन वार्ड बल्लारपूर येथील 55 वर्षीय पुरुष, बामनी बुधोली बल्लारपूर येथील 72 वर्षीय पुरुष, मूऊ येथील 46 वर्षीय पुरुष, वरोरा शहरातील 45 वर्षीय पुरुष, भिसी चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 55 वर्षीय महिला, जिवती येथील 45 वर्षीय महिला, अहेरी येथील 60 वर्षीय महिला, जुमाठा वार्ड वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष, केमिकल वार्ड, घुग्गुस  येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 529 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 483, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज बाधीत आलेल्या 1235 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 87,  बल्लारपूर 83, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 98, नागभिड 39, सिंदेवाही 23, मूल 22, सावली आठ , पोंभुर्णा सहा, गोंडपिपरी चार, राजूरा 30, चिमूर 152, वरोरा 219, कोरपना 23, जीवती 17 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.