Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! काकाचे मुंडक दिले नाही म्हणून १५ वर्षीय निर्दोष बालकाची निर्घुण हत्या!

आरोपीने मुलाच्या खंडणीसाठी त्याच्या काकाच्या मुंडक्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राज पांडेची निर्घुण हत्या केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी राज पांडेच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी राजचे अपहरण करून केली हत्या.
  • आएगी याद तुझे मेरी… तूम मुझे कभी भूल ना पाओगे.
  • मुलाला गायक बनविण्याचे कुटुंबाचे स्वप्न भंगलं.
  • आई- बहिण- वडिलांचा शोक अनावर.
  • संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरातील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईवर झालेल्या कथीत अत्याचाराचा वचपा काढण्यासाठी सुरज साहू या नराधमाने राज पांडे या अवघ्या १५ वर्षांच्या मुलाचं इंदिरा माता नगर येथून अपहरण करून हत्या करण्यात आली.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धक्कादायक म्हणजे, खंडणीच्या बदल्यात त्याने राजच्या काकाचे धड मागितले होते. सुरजनं गुरुवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास राज याचं अपहरण केलं होतं.  मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. आरोपीने मुलाच्या खंडणीसाठी एका व्यक्तीच्या मुंडक्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राज पांडेची हत्या केली आहे. 

MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्रिकेट खेळायला गेलेल्या राजचे दुचाकीस्वाराने गुरूवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरची मंडळी काळजीत होते. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.  पोलिसांकडून युवकाचा तपास सुरू होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याचवेळी अपहरणकर्त्याचा राज पांडेच्या पालकांना फोन आला. ‘तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याची सुखरूप सुटका करायची असेल तर अमुक एका व्यक्तीचे शीर आणून द्या’, या मागणीमुळे पालकांसह पोलीसही चक्रावले होते. सुरजनं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राज याचं अपहरण केलं होतं. खंडणी म्हणून आरोपीनं मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. यानंतर   काकाच्या मुंडक्याचा फोटो व्हॉट्सऍपवर द्या आणि मुलाला सोडवा अशी अजब मागणी अपहरणकर्त्याने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. सध्या आरोपी सुरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे.

अवघ्या तीनच दिवसांपूर्वी आएगी याद तुझे मेरी  तूम मुझे कभी भूल ना पाओगे हे गाणं गायलं होतं. त्याच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर ते व्हायरलही झालं होतं. पण हे गाणं त्याच्या जीवनातील अखेरचे गीत ठरेल याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. हिंगणा एमआयडीसीच्या हद्दीतून अपहरण करीत निर्दयी खून झालेला अल्पवयीन मुलगा राज पांडे याला गायक करण्याचं स्वप्न त्याच्या कुटुंबियांनी पाहिलं होतं.

सर्वांचा लाडका असलेल्या राज सोबत अनपेक्षित झालेल्या या आघातामुळे शनिवारी दुसऱ्याच दिवशी इंदिरा माता नगरात संतप्त पडसाद उमटले. राजच्या मारेकऱ्याला आमच्या हवाली करा, असा आक्रोश करीत वस्तीतला जमाव राजला अखेरचा निरोप देताच घाटावरून थेट पोलिस ठाण्यावर धडकला.

तळहातावर जपलेला काळजाचा तुकडा छिन्नविछिन्न अवस्थेत पाहून त्याची आई गिता, वडिल राजकुमार आणि बहिणीने फोडलेला हांबरडा तर अक्षरश: काळीज चिरणारा होता. “मेरे भाई को मार डाला, क्या कसूर था उसका” असा बहिणीने फोडलेला टाहो तर काळजाचा थरकाप उडवून गेला. राजचं अपहरण केल्यानंतर त्याला सोडण्याच्या बदल्यात काकाचं कापलेलं शीर पाठवा अशी विक्षिप्त मागणी राजचा मारेकरी सुरजने केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या या निर्दयी हत्याकांडावरून आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चेहऱ्यावर या घटनेचा कोणताच परिणाम दिसत नाही.

हे देखील वाचा  :

वांग्याची भाजी न केल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मनुष्यवस्तीत शिरला मध्यरात्री बिबट्या; बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद

12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात वर्षा गायकवाड यांची महत्त्वाची माहिती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.