Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अमरावती : शहरातील ५२ वर्षीय महिलेची सोशल मीडियावरून विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख तिला चक्क १४ लाख ७७ हजारांमध्ये पडली. तोतयाने सेवानिवृत्त महिलेची फसवणूक केली. प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील अचलपूर मार्गावरील कॉलनीत राहणाऱ्या महिलेची ओळख सोशल मीडियावरून (फेसबुक) एका विदेशी व्यक्तीसोबत झाली. त्या अनोळखी व्यक्तीने स्वत:हून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविल्यावर महिलेने रिक्वेस्ट स्वीकारली. फेसबुकवरून चॅटिंग नंतर त्यांनी एकमेकांसोबत व्हॉट्अ‍ॅपवरूनसुद्धा चर्चा केली. विदेशी व्यक्तीसोबत झालेल्या मैत्रीमुळे महिला उत्साहित होती. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर अनोळखी व्यक्तीने तिला विदेशातून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जे गिफ्ट पाठविल्या जाईल त्यामध्ये विदेशी करन्सी, ३५ हजार पाउंड, डायमंडचा समावेश असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने सदर पार्सल पाठविल्याची माहिती महिलेस दिली. त्यानंतर काही दिवसांनी एका व्यक्तीचा तिला फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला कस्टम विभागामधून बोलत असल्याचे तिला सांगितले.

आपले पार्सल आले असून, ते सोडविण्यासाठी काही रक्कम पाठविण्यासाठी स्वत:चा खातेक्रमांक दिला. महिलेने त्या खात्यावर काही लाख रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी आयकर विभागातून बोलत असल्याचा फोन त्यांना आला. त्यात कर न भरल्यास कारवाईची धमकी देऊन पुन्हा दिलेल्या बँकखात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महिलेने विदेशी मित्राला सात ते आठ टप्प्यांत एकूण १४ लाख ७७ हजार रुपये पाठविले. परंतु, त्यांना विदेशातून आलेले गिफ्ट मिळाले नाही. अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केली, अशी तक्रार महिलेने सायबर ठाण्यात नोंदविली. प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अनोळखी व्यक्तीने पाठविलेली फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये. अशा व्यक्तींसोबत ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे टाळा. त्यातून फसवणुकीची शक्यता अधिक असते.

– रवींद्र सहाने, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, अमरावती

हे देखील वाचा :

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सीजन स्वावलंबन’

 

Comments are closed.