Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

….धानाचा भुसा घेऊन येणारा ट्रक पलटला; अपघातात एक ठार तर तीन जखमी

अहेरी तालुक्यातील येलचिल च्या वळणा जवळ अपघात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : एटापल्ली वरून धानाचा भुसा घेऊन येणारी ट्रक (MH 31, CB 6681) पलटली असून आज मंगळवार दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास येलचिल पहाडीजवळच्या वळणार अपघात झाला. अपघातात ट्रक चालक नवनात शेंडे (38) जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत.

जखमीत अनिल बावणे (50), मोरेश्वर कावळे (45), प्रकाश मंदाडे (45) यांचा समावेश असून हे सर्व व मृतक ट्रक चालक चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सिमडा येथील रहीवासी आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघाताची माहिती मिळताच आलापल्ली येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे यांनी स्वतःच्या चारचाकी गाडी घेऊन लगेच घटनास्थळ गाठले व जखमींना तात्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख व आलापल्ली येथील टायगर गृपचे आदर्श केसलवार, अशोक मद्देर्लावार, मल्लेश आलाम, हसन खान व अहेरी येथील सुरेंद्र अलोने, शैलेश पटवर्धन, बिरजू गेडाम यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींना मदत केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.